मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेकजण हे रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचे बळी पडत आहेत. कोणत्याही गोष्टीचा तुटवडा झाला कि बाजारात काळ्या बाजाराचा सुळसुळाट होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये असे अनेक गैरप्रकार समोर येत आहेत.
आता नागपूरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील जामठा परिसरातील ‘कोविडालय’ नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसीवीर इंजेक्शन दिले होते. मात्र, यातील २ इंजेक्शन स्वतःकडे ठेवून गायकवाडने रुग्णाला चक्क ऍसिडीटीचे इंजेक्शन दिले. या कर्मचाऱ्याचा मित्र ते चोरलेले इंजेक्शन काळा बाजार करून विकताना पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे. https://t.co/S5FIB2GLgx
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2021
एका खाजगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख याने संताप व्यक्त केला आहे. ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे,’ अशा शब्दांत रितेशने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र
- पाकिस्तानला चपराक! काश्मीरप्रश्नी भारत-पाकने चर्चेतून तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्राचे आवाहन
- बंगाल हिंसाचाराचा निषेध अंगलट, बीडमध्ये प्रवीण दरेकरांवर गुन्हा
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

