लातूर : शिक्षक हा भावी पिढी घडवण्याचे काम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या हातून दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत, असे गौरव उद्गार राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. उदगीर येथे तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.
या वेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, ‘आज या ठिकाणी १०० शिक्षकांना पुरस्कार मिळाला, खरं तर सर्वच शिक्षक गुणवंत आहेत, त्यांच्या हातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक उच्च पदस्थ अधिकारी, नेते, साहित्यिक असे अनेक महान व्यक्ती निर्माण झालेले आहेत. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यात उदगीर हे शिक्षणाची गंगा आहे म्हणून उदगीर कडे पाहिले जाते. लातूर जिल्ह्यातील बाला उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा दर्जेदार बनल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सर्व वाडी तांड्या वरील शाळातुन ज्ञानार्जनाचा कार्य चोख बजावतात, शिक्षक हा लोकभिमुख असावा त्यांच्या हातून देशाची भावी पिढी निर्माण होते, मला घडवण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे.’
उदगीर येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा माझ्या उपस्थितीत संपन्न झाला.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.(१/२) pic.twitter.com/xjtOPdO4Qf
— Sanjay Bansode Official (@BansodeSpeaks) October 2, 2021
तुमच्या ज्या अडचणी, प्रश्न असतील ते शासन स्तरावरुन सोडवण्यासाठी मी मदत करेन, असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले. सद्याचे वातावरण सतत बदलत आहे त्यामुळे दुष्काळ, चक्रीवादळ, ढगफुटी असे प्रकार घडत आहेत, यामुळे सर्व शिक्षकांनी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही राज्यमंत्री बनसोडे यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती


