Share

मुंबई-पुणे पाठोपाठ औरंगाबादेतही सोमवारपासून ‘ड्राइव्ह इन लसीकरण’!

Published On: 

औरंगाबाद : मुंबई-पुणे पाठोपाठ औरंगाबादेतही सोमवारपासून ड्राइव्ह इन लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये हे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. महापालिकेकडून शहरात सुमारे ७० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. जम्बो लसीकरण मोहिम औरंगाबाद पालिकेने सुरू केली. सुरुवातीस महापालिकेला लसीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा ते अकरा हजार जणांचे लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या.

दरम्यान १ जून पासून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने लसीकरण सुरू केले व त्यानंतर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर पहिला तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत थांबावे लागू नये यासाठी मनपाने ड्राईव्ह इन ही संकल्पना राबविण्याचे ठरले आहे. त्यानुसार कारमधून आलेल्या नागरिकांना कारमध्येच लस टोचली जाणार आहे. इतर चार चाकी वाहनांमधून आलेल्या तसेच रिक्षांमधून आलेल्या नागरिकांनाही लस देण्यात येईल.

एपीआय कॉर्नर जवळील प्रोझोन मॉलच्या दोन्ही पार्किंग लसीकरण ड्राइव्ह इन साठी वापरण्यात येणार आहे. पार्किंग मध्ये घेतलेल्या नागरिकांना अर्धा तास थांबावे लागेल लस घेण्यासाठी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र सोबत आणावे लागेल. सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येईल असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!