Share

स्वप्न भंगले! भारताला नमवत न्युझीलंड बनला ‘विश्व चॅम्पियन’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

डब्ल्युटीसी स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने पहिल्या डावात २१७ धावांची मजल मारली. भारताकडुन उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर न्युझीलंडकडुन कायली जेमीसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावांची मजल मारली. न्युझीलंडकडुन सलामीवीर डेवॉन कॉनवेने सर्वाधीक ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

पहिल्या डावात न्युझीलंडला निर्णायक ३२ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आश्वासक सुरुवात करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकही खेळाडू मोठी खेळी साकारण्यात अयशस्वी झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांवर अटोपला. यष्टीरक्षक रिषभ पंतने भारताकडुन सर्वाधीक ४१ धावांची खेळी साकारली. तर न्युझीलंडकडुन टीम साउथीने ४ गडी बाद केले. यासह चौथ्या डावात न्युझीलंडला सामना जिंकण्यासाठी १३९ धावांचे लक्ष्य होते. हे आव्हान न्युझीलंडने २ गडी गमावत सहज पुर्ण केले. कर्णधार केन विलियमसनने न्युझीलंडकडून सर्वाधीक ५२ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. ७ गडी बाद केल्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!