Share

‘ओबीसी नेते म्हणून घेणाऱ्या छगन भुजबळ आणि वडेट्टिवार यांनी राजिनामा द्यावा’, खा. भागवत कराड यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद: राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाज आरक्षण प्रश्नावरून आंदोलन करण्यात येत आहे तसेच अनेक ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आरक्षण या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे असे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात आज भाजप तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. तयावेळी बोलताना खासदार भागवत कराड यांनी छगन भुजबळ व वडेट्टिवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

खासदार डॉ.कराड म्हणाले की, सरकारमध्ये स्वत:ला ओबीसी नेते म्हणून घेणाऱ्या छगन भुजबळ आणि वडेट्टिवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे दोन्ही मंत्री उपस्थित असतात. या बैठकीत त्यांनी प्रभाविपणे ओबीसीचा मुद्दा मांडावा. आणि न्यायालयास हवा असलेला एम्पिरिकल डाटा द्यावा. यासह नेमण्यात आलेल्या ओयोगाचे नेमके काम काय त्याबद्दल माहिती या दोन ते तीन गोष्टी सर्वोच्च न्यायलयास देत नाही. हे देण्यासाठी या मंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी हे शक्य नसेल तर ओबीसीसाठी मंत्रीपदाचा राजिनाम द्यावा.

ओबीस म्हणून या नेत्यांनी या मुद्द्यासाठी बाहेर पडले पाहिजेत. ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप कोर्टाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशाराही डॉ. भागवत कराड यांनी दिला आहे. शहरात येत्या शनिवारी दि. २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आमदार अतुल सावे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!