🕒 1 min read
पैठण : पैठण येथील नाथसगर जलाशयात सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अहमदनगरचा युवक पाण्यात बुडाला असून जोरदार वारा व उसळणाऱ्या लाटा यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी औरंगाबाद येथील अग्निशामक दलास पाचारण केले अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले परंतु रात्र झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना युवकाचा शोध घेता आला नाही. मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. तेव्हा दुपारी तरुणाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले.
पैठण पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार अहमदनगर चा आदर्श रमेश शिरसाठ (वय १८) रा भिंगार अहमदनगर येथील युवक दोन दिवसांपूर्वी नातेाइकांसोबत इसरवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी आला होता. सोमवार आदर्श हा आई, मोठा भाऊ व नातेवाईकांसोबत नाथसागर धरण पाहण्यास गेला होता. नाथसागर धरणाचे पाणी पाहून त्याला धरणात पोहण्याचा मोह झाला. आदर्शने साखळी क्र.११४ ते ११५ समोर पाण्यात उडी मारली. मात्र जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठ्या पाण्याच्या लाटा उसळत होत्या. आदर्श यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
माहिती मिळताच पैठणचे पोनि किशोर पवार, सपोनी गजानन जाधव, सपोनि गिराशे, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वाहुळ, राजू आटोळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शहरातील बचावदलाच्या कार्यकर्त्यांना पाचारण करून सायंकाळी सात वाजेपर्यंत आदर्शचा शोध घेतला. मात्र आदर्शचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोनि पवार यांनी औरंगाबादच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र अंधार जास्त झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान आज मंगळवारी सकाळ पासून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
- ‘टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?’ आव्हाडांच्या निर्णयावर आता काँग्रेसचा आक्षेप
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर EDकडून कारवाई होण्याची शक्यता
- पुणेकरांनो काळजी घ्या…आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
