मुंबई : मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई दूर करून ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी पोचवण्याच्या उद्देशाने तत्कालीन भाजप सरकारने आणलेली मराठवाडा वाॅटरग्रीड योजना सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी सरकारने ही योजना टप्याटप्याने राबवण्याचे आश्वासन दिले होते. आज (दि. २३ जून) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याचा पाण्याची ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील इतर तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
- नातेवाईकाच्या लग्नासाठी आला अन् जलाशयात पोहण्याच्या मोहापायी बुडाला!
- ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर EDकडून कारवाई होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

