🕒 1 min read
मुंबई: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी त्यांना मिळालेल्या उमेदवारीबद्दलचा किस्सा सांगितला आहे. राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी घोषणा केली.
“ज्यांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही संधी मिळाली नाही, ज्यांना आपण या टप्प्यावर पोहोचू असं कधीच वाटलं नव्हतं. ते आता अत्यंत आनंदी आहेत. २१ जूनला माझी उमेदवारी जाहीर करण्याच्या अवघ्या १५ मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून माहिती दिली.”, असा खुलासा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे.
दरम्यान विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून द्रौपदी मुर्मू यांनी ही निवडणूक का लढवत आहोत, यामागील खुलासा केला आहे. “मी हे काम योग्य प्रकारे करू शकेन का? यावर मोदींनी म्हटले, की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला हे करायचं आहे. आणि याक्षणी मी हो म्हटलं.”
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस…”, असंसदीय शब्दांच्या यादीवरुन संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : भाजपला ऐतिहासिक शब्दांचे भाले का टोचावेत?; ‘त्या’ नियमावरून शिवसेनेची टीका
- T20 World Cup 2022 : शेवटच्या क्षणी ‘या’ दोन संघांनी मिळवले टी-२० विश्वचषकात स्थान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
