Share

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ‘त्या’ प्रकरणी नऊ दिवसांची ईडी कोठडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey ) यांना त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ईडीने अटकेची कारवाई केली आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान ईडीने ‘एनएसई’च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासह संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. संजय पांडे यांची दिल्ली ‘ईडी’ने दोन दिवस चौकशी करत मंगळवारी अटक केली. संजय पांडे यांच्या आयसेक सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत २००६ साली त्यांनी आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले होते. या कंपनीला २०१० ते २०१५ या दरम्यान एनएसई सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षण करण्याचे कंत्राट दिले होते. पण त्या काळात  गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच ‘एनएसई’ कर्मचाऱ्यांचे फोनटॅपिंग केल्याचा आरोपही संजय पांडे यांच्यावर आहे.

आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला- रवी राणा

दरम्यान या प्रकरणी आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत “आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला”, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत म्हटले कि, “नवनीत राणा आणि मला दोन दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.  लॉकअपमध्ये आम्हाला पाणी दिलं नाही, बसायला चटई दिली नाही. आमच्या घरात पोलीस घुसवून आम्हाला अटक केली. यामुळे संजय पांडेंचा पापाचा घडा भरला होता. आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे”,

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!