मुंबई: १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. यावरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.
“शब्द किमान अपमान कमाल, नागपुरी मिरची म्हणजे तिखट जाळ”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीक करत फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले होते फडणवीस?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न घेण्याबाबत शरद पवारांचा व्यक्तिगत निर्णण असेल. एनडीएजवळ आणि त्यांना मदत करणारी एकूण मत बघितली तर, एनडीए जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येणार हे कुठल्याही राजकीय नेत्याला समजू शकतं. मात्र पवारांनी यामधून बाहेर पडण्यासाठी प्रकृतीचं कारण सांगितले. आपण त्याचा आदर करायला हवा. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आधी माझी उधारी द्या…” ; हॉटेलचालकाने सदाभाऊ खोतांना अडवलं!
- VIDEO : जुनी सवय मोडायची नाय..! रोहित शर्मा मुंबईच्या गल्लीत खेळतोय क्रिकेट; ठोकला उंच षटकार!
- चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ वर्तवणुकीमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल ; पाहा VIDEO
- “शरद पवार राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल” ; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान!
- शर्टची बटणे उघडे ठेवून घराबाहेर पडली ईशा गुप्ता ; पाहा व्हायरल व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

