🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख ॲड. जयदेव गायकवाड यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंतांचा संघर्ष या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शरद पवारांनी (sharad pawar) सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत मोठे वक्तव्य केले.
“बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या देशाला स्थैर्य मिळालं. आज श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहात आहोत. मात्र तशी वेळ आपल्या देशावर आलेली नाही आणि यापुढेही येणार नाही. याचं सर्व श्रेय हे बाबासाहेबांना जातं.”, असे शरद पवार यांनी म्हटले.
बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या देशाला स्थैर्य मिळालं. आज श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहात आहोत. मात्र तशी वेळ आपल्या देशावर आलेली नाही आणि यापुढेही येणार नाही. याचं सर्व श्रेय हे बाबासाहेबांना जातं.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2022
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन अर्थशास्त्र विद्यापीठात तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा पाहू शकता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दि सिम्बॉल ऑफ नॉलेज’, असे त्या पुतळ्याखाली लिहीले आहे. माझ्या मते देशातील एखाद्या व्यक्तीचा देशाबाहेर इतका मोठा सन्मान झालेला नाही. बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन ही एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती. असेही शरद पवार यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- “मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे…”, शरद पवारांनी सांगितली ‘तो’ प्रसंग
- “…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
- IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन
- IPL 2022 RR vs CSK : चेन्नईला हरवत राजस्थानची दुसऱ्या स्थानी झेप; जयस्वाल, अश्विनची झुंजार फलंदाजी!
- IPL 2022 RR vs CSK : चेन्नईचं राजस्थानला १५१ धावांचं आव्हान; मोईन अलीचं हुकलं शतक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

