Share

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !

Published On: 

पंढरपूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. तर, आषाढी वारी, गणेशोत्सव, ईद, नाताळ अशा सर्व धर्मियांच्या सणांवर व धार्मिक कार्यक्रमांवर कोरोनाच्या सावटामुळे निर्बंध होते.

दरम्यान, पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यंदा राज्य सरकारने वेळीच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नव्या वर्षातील पंढरपुरातील माघी यात्रेवर देखील बंदी आली असून आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.

यासोबतच, उद्या माघ शुद्ध दशमीच्या रात्री बारापासून एकादशीच्या रात्री बारापर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. तर, माघी यात्रेवरून वारकरी व राज्य सरकार यांच्यात संघर्षाची चिन्हे निर्माण होत आहेत. संचारबंदीला ह. भ. प बंडा तात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. वारकऱ्यांचा उद्रेक होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, असा थेट इशारा कराडकर यांनी दिला आहे.

वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात वारकरी जमा होत असतात. मात्र, गर्दी टाळण्यासाठी शहरातील मठ, धर्मशाळांमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांनी मठ रिकामे करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. तसेच मठात वारकरी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. यामुळे वारकरी संप्रदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोठमोठ्या शहरातील बाजारपेठांमध्ये वारीपेक्षा जास्त गर्दी होते. राजकीय पक्षांच्या मेळाव्यांना प्रचंड गर्दी होते . ती चालते मग वारीलाच विरोध का ? असा सवाल देखील वारकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!