🕒 1 min read
मुंबई : मराठी टिव्ही जगतात अनेक ऐतीहासीक आणि पौराणीक मालिकाची मेजवानी प्रेक्षकांना नेहमी भेटत असते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की डोळ्यासमोर प्रथम ज्या अभिनेत्याचे नाव येते ते खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे. डॉ अमोल कोल्हे हे सध्या सोनी मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारत आहे.
‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत सध्या लाल महलावर शाहिस्तेखानावर झालेल्या आक्रमणाचा भाग दाखवण्यात येत आहे. याच भागाच्या चित्रीकरणादरम्यान डॉ अमोल कोल्हे यांना दुखापत झाली होती. या आशयाची त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या पोस्टनंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या चागंल्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली होती. त्यावर भारावुन जात अमोल कोल्हे यांनी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमोल म्हणतात काळजी नसावी महाराज निभावून नेतील. त्यांची ही पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CQh8Cowp7Ck/
महत्वाची बाब म्हणजे जेव्हा अमोल कोल्हे यांनी दुखापतीविषयीची पोस्ट शेअर केली होती. त्याच पोस्टवर त्यांच्या एका चाहत्याने ‘छत्रपती शिवाजी महाराज सगळं निभावुन नेतील’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेने अमोल कोल्हे चांगलेच भारावुन गेले. आणि त्यांनी त्याच आशयाची पोस्ट करत दुखापतीविषयी अपडेट दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान! मुंबई, ठाण्यात बोगस लसींचा सुळसुळाट, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
- महाराष्ट्राने काढला पहिला नंबर ; आतापर्यंत ‘इतक्या’ कोटी लोकांचे झाले लसीकरण
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- राज्यात आज १०,१३८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
