🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. बुधवारी होणाऱ्या आंदोलनाचं पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाई बाबत माहिती दिली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्याच्या स्थितीचा आढावा घेत, पोलिसांना योग्य ते निर्देश दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्यं पावलं उचला. तसेच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याशी फोनवरुन चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात :
“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.
१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई :
१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
