Share

“साहबजादे को पब में पाया है…” ; भाजपची राहुल गांधींवर खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नेपाळमध्ये लग्नसोहळ्यासाठी पोहोचलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका पबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेते कॉंग्रेसवर टीका करत आहेत. यानंतर कॉंग्रेसने देखील पलटवार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर टीका केली.

“देश में संकट छाया है, मगर साहेब को विदेश भाया है!”, अशी टीका कॉंग्रसेने केली आहे. यावर भाजपने देखील खोचक शब्दात कॉंग्रेसवर टीका केली आहे. “साहबजादे को पब में पाया है, कल किए ट्वीट का मतलब आज समझ आया है!”, असा पलटवार भाजपने केला आहे.

राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले होते. काल ते त्यांची मैत्रिण सुम्निमा दास हिच्या लग्नसोहळ्याला पोहचले. लग्न आज होणार असून रिसेप्शन 5 मे रोजी होणार आहे. सुम्निमाचे लग्न निमा मार्टिन शेर्पासोबत होणार आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहे. राहुल यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक दारू पित आहेत.

काँग्रेस नेतृत्वाच्या संकटाशी झुंजत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अलीकडेच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या सर्वसमावेशक परिवर्तनाचा कृती आराखडाही मांडला आहे. मात्र, प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा डाव फसला आहे.

महत्वाच्या बाचम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!