Share

‘या’ वक्तव्यामुळे राज ठाकरे अडचणीत, अटकेचीही शक्यता! पाहा VIDEO

Published On: 

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच औरंगाबाद सभेचे मुख्य आयोजक राजीव जेवळीकर आणि इतर आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या सभेतल्या भाषणाची सलग पाच तास चौकशी झाली आहे. त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे देण्यात आला आहे. सभेपूर्वी देण्यात आलेल्या नियमावलींचं उल्लंघन झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी भाषणात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.”

या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आता राज ठाकरे यांना अटकेची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!