मुंबई : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल आता सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण काल दिले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले आहेत. थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. वर्षभरापासून शेतकरी अडचणीत आले आहेत. अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि महापूराने त्रस्त आहे. सरकारने दीड वर्षापूर्वी 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे पैसे शेतकऱ्यांना आता ताबडतोब द्या.
महापुरात शेती बुडाली आहे. त्यामुळे 2019च्या धर्तीवर बुडीत कर्ज माफ करा. पीकच शिल्लक नाही तर कर्ज भरणार कसं? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट करून चालणार नाही. शासन निर्णय झाला पाहिजे. सरकारने जीआर काढून जबाबदारी घ्यावी आणि बँकांना तसे कळवावं, असं शेट्टी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राकडून अमृत दोन पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळवून देणार : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य तालिबानमध्ये केले असते तर चौकात फटके मारले असते- सुधीर मूनगंटीवार
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- सण-उत्सव नंतरही साजरे करू…हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल – मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

