औरंगाबाद : शहराची तन्हान भाग विणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्राकडे प्रस्ताव दाखल केल्यास केंद्राकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज सोमवारी दिले.
शहर नवीन पाणीपुरवठा प्रकल्प आढावा बैठक सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आ. अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी १६८० कोटी रुपयांच्या योजनेची माहिती दिली. यात सध्या शहराला १२० एम एल डी पाणी मिळत आहे. या योजनेअंतर्गत शहराची लोकसंख्या २०५२पर्यंत ३३.१७ लाख गृहीत धरून प्रतिदिन दरडोई १३५ लिटर पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय जे सिंग यांनी पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करून पाणी पुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाथसागरापासून ते शहरापर्यंत होणाऱ्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांची माहिती घेतल्यानंतर या योजनेसाठी केंद्र सरकारकडून जी काही मदत लागले.यासाठी प्राधान्याने देईल. मी या शहराचा महापौर राहिलो आहे. पाणी प्रश्नांची चांगली माहिती आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची असून शहराचा प्राण आहे.त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल.केंद्र सरकार च्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी संबंधित मंत्र्यांशी बोलून परवानगी मिळवून देईल तसेच अमृत दोन टप्प्यांसाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा त्यासाठी निधी मिळवून देतो असे आश्वासन देऊन पाणी पुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण करा असे निर्देश दिले.
अमृत २ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळाला तर केंद्र सरकारकडून ५० टक्के, राज्यशासन २५ टक्के व महानगरपालिकेकडून २५ टक्के हिस्सा टाकावा लागणार आहे. हि योजना महाराष्ट्र शासनच्या नगरोथ्यान योजनेअंतर्गत १६८०.५० कोटी रुपयांची शहराची नवीन पाणीपुरवठा योजना आहे.शासकीय अनुदान ११७६.३५ कोटी, महानगरपालिका पालिकेचा हिस्सा ५०४.१५ कोटी रुपये आहे. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर एस लोलापोळ, मनपाचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा किरण धांडे, उप अभियंता के.एम. फालक, कनिष्ठ अभियंता एम .एम .बाविस्कर आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना ‘दे धक्का!’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’


