नागपूर : येत्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यात नागपूर महानगरपालिकेचा पण समावेश आहे. नागपूर महानगरपालिका सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे.
नागपूर महापालिकेत एकूण १५१ नगरसेवकांपैकी १०८ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. मात्र आता नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल पाहायला मिळत आहे ; कारण नागपूरमध्ये कोणत्याही विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची उमेदवारी अजू पक्की झालेली नाहीये. नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. आपण विद्यमान नगरसेवक आहोत म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी अश्या भ्रमात कोणीही राहू नये असे स्पष्ट आदेश नागपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षात प्रत्येक जण हा समानच असतो , प्रत्येकाने तळागाळात जाऊन जनतेची सेवा करायला पाहिजे. मात्र जनतेची सेवा करताना आपण खूप ताकदवान आहोत आणि त्यामुळे आपल्यालाच भारतीय जनता पक्षाची उमेद्वारी मिळणार आहे अश्या भ्रमात कोणीच राहू नये असे स्प्ष्ट संकेत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार अनिल सोले यांनी आज दिले. आज भारतीय जनता पक्षाची नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठक झाली त्यावेळेज अनिल सोले बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- डीआरएस मागताना रोहितची अजब स्टाईल पाहिलीत का?
- ‘‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही’; यशोमती ठाकूर यांचा विश्वास
- मिसळ खातानाचे फोटो टाकत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोला
- राजकारण करताना सभ्य भाषेचा वापर करावा ; जयंत पाटील यांचा सर्वांनाच सबुरीचा सल्ला म्हणाले …
- साहाच्या खुलास्यानंतर बीसीसीआय उचलणार मोठे पाऊल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

