मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप हे विविध ठिकाणी आमने-सामने आल्याचं आज सकाळपासूनच पाहायला मिळालं. तरनाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज दुपारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाकडून देखील दिलासा मिळालेला नाही.
राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्यातील विविध नेत्यांनी तीव्र निषेध केला असून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘केंद्रीयमंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांवर संगमेश्वरमध्ये जी कारवाई करत आहात! या कारवाईच्या मागे असलेल्यांनी लक्षात ठेवावे की ही मुघलशाही किंवा तालिबानी राजवट नाही! महाराष्ट्राचा तालिबान करू नका!,’ असं दरेकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
केंद्रीयमंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांवर संगमेश्वरमध्ये जी कारवाई करत आहात!
या कारवाईच्या मागे असलेल्यांनी लक्षात ठेवावे की ही मुघलशाही किंवा तालिबानी राजवट नाही!
महाराष्ट्राचा तालिबान करू नका!#NarayanRane— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 24, 2021
देवेंद्र फडणवीस यांची टीका –
‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!’ असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यलयात सोडल्या मांजरी
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा संगमेश्वरमधून अटक केल्यानंतर औरंगजेबाचं सरकार संपलं होतं’
- नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज; तपासणीनंतर डॉक्टरांच मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

