पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली होती.
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी भाजप पुणे शहर मध्यवर्ती कार्यलायामध्ये कोंबड्या सोडल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप पुणे शहर आणि युवा मोर्चाकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे मांजरीला दूध पाजून निषेध नोंदवला. काही वेळापूर्वी पुण्यातील भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यलयावर धडकले होते. तसेच यावेळी ‘घर-कोंबड्या असणाऱ्या उद्धव ठाकरेचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या आहेत.
दरम्यान आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कालपासून नारायण राणेंविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच तक्रारींच्या अनुषंगाने नारायण राणेंवर कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेना म्हणजे आता नपुंसकांची टोळी झालीये’, नितेश राणेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- भाजपच ठरलं ; ‘जन आशिर्वाद यात्रेचे रुपांतर आता जन आंदोलनात होणार’
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- नारायण राणेंना मोठा धक्का! रत्नागिरी कोर्टाने अटकपूर्व जामिन फेटाळला, अटकेची टांगती तलवार कायम
- नारायण राणेंना अटक अटळ? रवानगी नाशिक की पुण्याला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

