मुंबई : राज्य सरकारने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने आज ता. 21 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.
या शिष्टमंडळात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ,पंढरपूर चे सदस्य ह.भ.प.प्रकाश महाराज जवंजाळ, संत तुकारामांचे वंशज आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर चे सदस्य ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह.भ.प संजयनाना महाराज धोंडगे, प्रख्यात किर्तनकार आणि विश्व हिंदु परिषदेचे ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर आदि सहभागी होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, ‘महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी.
आमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी कारण असेही हे सरकार उठसूठ केंद्राकडेच सर्व मागत आहे. धर्मरक्षक राज्यपाल वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी नक्की प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे.’ असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवारांपाठोपाठ सोनिया गांधीनीही बोलावली बैठक, ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार गहन चर्चा
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत नाही! काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- बेरोजगार, गरीब आणि मूक बधिर असणाऱ्या हजारो लोकांचं ‘असं’ केले जात आहे धर्मांतर
- प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजप नेत्यांना होऊ लागल्या गुदगुल्या


