नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची होत असून शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यातच, आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही 24 जून रोजी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, देशभरात सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून या मुद्याकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे. हाच मुद्दा लक्षात घेवून सोनिया गांधी या सर्वसामान्यांशी संबंधित महागाईच्या मुद्यावर रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरूद्ध देशव्यापी निदर्शने केली. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत आणि बऱ्याच राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना संसर्गासंदर्भात कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणावरही चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील कुरबुरी, आगामी विधानसभा निवडणुकांसारख्या मुद्द्यांसह सद्यस्थितीतील घडामोडी आणि इतर राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल. पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत नाही! काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- बेरोजगार, गरीब आणि मूक बधिर असणाऱ्या हजारो लोकांचं ‘असं’ केले जात आहे धर्मांतर
- प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजप नेत्यांना होऊ लागल्या गुदगुल्या


