नवी दिल्ली : देशभरात आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्व राजकीय नेते या दिवसानिमित्त योगाभ्यास करताना दिसत आहेत. देशवासीयांना या दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सातव्या योगदिनानिमित्त देशातील जनतेला संबोधित केलं. तसेच आजपासून संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने जगभरातील लोकांसाठी नवीन अॅप सुरु करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. एमयोगा असं या अॅप चं नाव आहे.
दरम्यान काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे. सिंघवी योगा संदर्भात ओम आणि अल्लाहचा उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिंघवी यांनी ट्विट केले की, ‘ॐ चा जप केल्याने ना योग अधिक शक्तिशाली होईल आणि अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही.’
ॐ के उच्चारण से ना तो योग ज्यादा शक्तिशाली हो जाएगा और ना अल्लाह कहने से योग की शक्ति कम होगी | #YogaDay2021 #InternationalDayOfYoga
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) June 21, 2021
अभिषेक मनु सिंघवी यांच्या या ट्विटवर बाबा रामदेव म्हणाले, ‘ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ अल्लाह, देव, खुदा सर्व एक आहेत. तर ॐ बोलण्यात काय हरकत आहे, परंतु आम्ही कोणालाही खुदा बोलण्यास मनाई करत नाही. या सर्वांनीही योग केले पाहिजेत, तर त्या सर्वांना एकच देव दिसेल, असे बाबा रामदेव म्हणाले.
दरम्यान, योग दिनावर सुप्रीम कोर्टाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांनी कडाडून टीका केली आहे. भारतात अनेकांना खायला अन्न मिळत नाही आणि बेरोजगारीची समस्या तीव्र बनली असताना त्यांना योगाचे धडे दिले जात आहेत, असं न्या. काटजू यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन एकामागून एक अनेक ट्विट करत त्यांनी सरकारच्या विविध योजना आणि योग दिनावर कडाडून टीका केली.
https://twitter.com/mkatju/status/1406559717917270018
मी याला नाटक मानतो. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात ५० टक्के लहान मुलं कुपोषित आहेत. देशात ५० टक्के महिला अॅनिमियाग्रस्त आहेत. तसेच बेरोजगारीनं उच्चांक गाठला आहे. खाद्य पदार्थ, इंधन, गॅस सिलेंडर इत्यादींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांवरील संकटं तसेच जनतेसाठी योग्य आरोग्य सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थितीत लोकांना योग करण्यास सांगणं म्हणजे हास्यास्पद आणि थट्टा आहे अशी टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा देऊनच विधानसभा निवडणुका घ्या’
- ‘मराठा व ओबीसी आरक्षण ही तुमची जबाबदारी, केंद्राकडे बोट दाखवू नका’, पंकजा मुंडेंचा ठाकरेंना इशारा
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ
- ‘तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय’
- ‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर, आणि ‘हे’ ट्विट फ्रेम करून लाव’ ; वॉर्नच्या ट्विटवर सेहवागची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

