Share

वीजबीलाबाबत सक्ती करु नये; भारतीय शेतकरी कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा!

Published On: 

औरंगाबाद : पैठण तालुक्यात विज वितरण कंपनीतर्फे विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करने व सक्तीची विज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने ही कार्यवाही तात्काळ थांबवावी व विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्यात येत असून सक्तीने विज बिल वसुली करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी अनुदान हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करुन प्रत्यक्षात ४ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे अतिवृष्टी व वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासन व विज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करुन शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.

विज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे शेतातील उभ्या पिकांना जगविणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विज वितरण कंपनीने कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवून शासनाने जाहीर केलेले अतिवृष्टीचे अनुदान देऊन शेतकऱ्यांवरील संकटाचे निवारण करावे. नसता शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राज्याचे चिटणीस मंडळ सदस्य डॉ. उमाकांत राठोड,तालुका चिटणीस चंद्रशेखर सरोदे, अल्पसंख्याक चिटणीस अन्सर शेख आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!