Share

अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारवर (MVA) निशाणा साधत आहे.

काही दिवसापूर्वीच केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे सरकार कोसळण्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होते. ‘एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. महाविकास आघाडी सरकारचं आयुष्य लवकरच संपणार आहे,’ अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली होती.

त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार असे सूचक संकेत दिले. यावरून आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षाला सडेतोड उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, रोज कोण कोण बोलतात सरकार जाणार, सरकार जाणार म्हणणारे देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण सरकारचे दुसरीकडे काम सुरू असल्याचे अजित पवार म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सरकार पुढे जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्ष काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान,  नाशिक येथील कळवण तालुक्यातील नाकोडे गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!