Share

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ‘हा’ खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टीम इंडियाचा (India national cricket team) स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे यात शंका नाही. पण मागील काही काळापासून तो खराब फॉर्म मधून जाताना दिसत आहे. हार्दिक केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही तो सतत अपयशी ठरत आहे. टी-20 विश्वचषकात संपूर्ण देशाला त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या. पण त्याची कामगिरी खराब झाली. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना आता हार्दिक सारख्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे जो त्याची जागा घेऊ शकेल. असा एक खेळाडू आहे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर हार्दिकचा पत्ता कट करू शकतो.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या वर्षी डिसेंबरमध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. दरम्यान, सध्याच्या न्यूझीलंड मालिकेपासून बऱ्याच दिग्गज खेळाडूंनी विश्रांतीवर राहण्याचा निर्णय घेतला होता. हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुन्हा संघात परतणार आहेत.

मात्र हार्दिक पांड्याची खराब कामगिरी पाहता एक गोष्ट निश्चित आहे की, त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला त्याचे स्थान दिले जाऊ शकते. अय्यरने अलीकडेच आयपीएल २०२१ मध्ये अप्रतिम कामगिरी केली, त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही संधी देण्यात आली.

केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. व्यंकटेशने तिसऱ्या T20 सामन्यात 3 षटकांच्या कोट्यात 12 धावा देत 1 बळी घेत तो अतिशय किफायतशीर गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. फलंदाजीतही त्याने आपली चमक दाखवली आहे.

त्याने 15 चेंडूत 20 धावांची छोटी खेळी खेळली, ज्यात 1 धमाकेदार षटकार होता. या मालिकेत व्यंकटेशला आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळाली नसल्याचे खुद्द भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. येत्या सामन्यांमध्ये व्यंकटेश अय्यरला खेळण्याची संधी दिल्यास तो मोठा सामना विजेता ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!