🕒 1 min read
कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा खराब फॉर्म कायम राहिला. पहिल्या डावात केवळ 26 धावा करणारा पुजारा दुसऱ्या डावातही फारसे काही करू शकला नाही आणि 22 धावा करून तो काईल जेमिसनचा बळी ठरला.
ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर, जेमिसनचा उसळणारा चेंडू पुजाराच्या ग्लोव्हजला लागला आणि किवी यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलच्या हातात गेला. मैदानावरील पंचांनी त्याला नॉट आऊट दिला, पण डीआरएस मिळाल्यानंतर पुजाराला परतावे लागले. या डावात बाद होताच पुजाराच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर शतक न झळकावता संयुक्त सर्वाधिक खेळी करण्याचा विक्रम आता पुजाराच्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे, पुजाराने 2019 पासून आतापर्यंत 39 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने या बाबतीत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांची बरोबरी केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वाडेकर यांनी 1968 ते 1974 या काळात सलग 39 डावांमध्ये एकही शतक झळकावले नाही. याआधी पुजाराने 2013-16 मध्ये 37 डावात एकही शतक झळकावले नव्हते.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

