Share

‘मविआ सरकार पूर्ण पाच वर्ष सत्तेत काम करेल आणि पुन्हा…’; भुजबळांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारवर (MVA) निशाणा साधत आहे.

काही दिवसापूर्वीच केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे सरकार कोसळण्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होते. ‘एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. महाविकास आघाडी सरकारचं आयुष्य लवकरच संपणार आहे,’ अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली होती. यावरून आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) नारायण राणेंना टोला लगावला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, ‘अनेकजण सरकार जाईल, असं म्हणतात. पण, आमचं सरकार पाच वर्ष काम करणार आहे. मुख्यमंत्रिपद येते आणि जाते. पण, लोकांसाठी जो लढतो आणि बोलतो तो व्यक्ती लोकांच्या लक्षात राहतो. आज दोन वर्षांपूर्वी मी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजूनही हे काही लोकांना पचत नाही. काही जण म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार फेब्रुवारीमध्ये, जूनमध्ये जाईल. पण, महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्ष सत्तेत काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल’, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त करत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!