🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय कसोटी (Indian Test Cricket Team) संघाचा वरिष्ठ खेळाडू आणि कार्धार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेला काही विशेष करता आले नाही. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही डावात 35 आणि 4 धावा केल्या.
डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्य रहाणेने शेवटचे कसोटी शतक झळकावले होते, या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवला. आणि एक संस्मरणीय विजय नोंदवला गेला.
कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजाराची विकेट लवकर पडली आणि त्यानंतर जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आली, पण तो स्कोअरबोर्डवर केवळ 4 धावाच जोडू शकला आणि एजाज पटेलने त्याला LBW करून आऊट केले.
अजिंक्य रहाणेच्या फ्लॉप खेळानंतर भारतीय क्रिकेट चाहते संतापले आणि त्यांनी सोशल मिडीयावर रहाणेला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. #ThankYouRahane ट्विटरवर ट्रेंड करू लागले. तरुण क्रिकेटपटूंना संधी मिळावी म्हणून रहाणेने लवकर निवृत्ती घ्यावी, असे नेटकरी म्हणत आहेत. सातत्याने खराब फॉर्म मधून जात असलेया रहाणेला सोशल मिडीयावर जोरदर ट्रोल केल जात आहे.
https://twitter.com/JingiJhandBa/status/1464828340070596608?s=20
https://twitter.com/Chandra__Girish/status/1464824065185566721?s=20
https://twitter.com/dpcricket13/status/1464848377409982467?s=20
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1464832534580056067?s=20
https://twitter.com/Cricky_Nerd/status/1464819537635774465?s=20
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

