Share

IPL 2022: फिटनेस टेस्टचा रिझल्ट आला; हार्दिक पास तर शॉमुळे दिल्लीला लागणार धक्का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आता आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण, त्याआधी पृथ्वी शॉ आणि हार्दिकबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्याआधीच काही खेळाडूंच्या फिटनेसला धोका निर्माण झाला आहे. यो यो टेस्टसाठी हार्दिक आणि पृथ्वीला बोलवण्यात आले होते. ज्यात हार्दिक पास झालाय तर पृथ्वी शॉ फेल. यामुळे दिल्लीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आयपीएलमध्ये भाग घेणारे खेळाडू ज्यांचा BCCI सोबत केंद्रीय करार आहे त्यांच्या फिटनेसची चाचणी घेतली जात आहे. यात बराच काळ दुखापतीत घातल्यानंतर हार्दिक पंड्या (hardik pandya) पास झाला आहे. ज्यामुळे त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे दार उघडले आहे. एकीकडे हार्दिकबद्दल चांगली बातमी समोर येत असतानाच दुसरीकडे फिटनेसमुळे निराश झालेला पृथ्वी शॉ (prithvi shaw) यो यो टेस्ट पास करू शकला नाही.

यो-यो पात्रतेसाठी सध्याचा आकडा १६.५ आहे. सलामीवीर शॉला यात केवळ १५ गुण मिळाले. केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंमध्ये अजूनही त्याचा समावेश नाहीये. पण, त्याच्या फिटनेसची माहिती देण्यासाठी तो एनसीएमध्ये होता. ज्यामुळे या टेस्टचा कोणताही परिणाम आयपीएलवर होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्सने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!