Share

“तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका” – अजित पवार  

Published On: 

पुणे : सुपे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अजित पवारांनी खंत व्यक्त केली. म्हणाले, एसटी कामगारांना सांगत होतो, चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, पण ऐकले नाही. काहीजण जाणीवपूर्वक भावना भडकवण्याचे काम करत आहेत. यासह राजकारण होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

म्हणाले, “कोरोनामुळे अडचणींना कित्येकजणांना सामोरे जावे लागले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले. आता कुठे आपण सावरायला लागलो आहोत. अनेक प्रश्न आहेत. एकमेकांशी चांगले वागा. गैरसमज पसरवू नका. बंधूता, एकात्मता जपा ही साहेबांची शिकवण आहे. संस्थेतून लोकांना मदत व्हावी. राजकारण होवू नये”, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली.

तसेच पुढे म्हणाले, तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका. बोलण्याच्या ओघात माणूस विसरून जाऊ शकतो. त्याचा गैरअर्थ काढू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्याला बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
“तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका” – अजित पवार  
अनिल बोंडे यांच्या विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल
“एसटी कामगारांना सांगत होतो…ऐकलं नाही” – अजित पवार
“त्या” कीर्तनकारांचे नाव जाहीर करून करणार कारवाईची मागणी – तृप्ती देसाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!