Share

कलम ३७० रद्द करणे हे राष्ट्रहिताचे, त्याचे राजकारण नको : उपराष्ट्रपती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच देशातील विरोधी पक्षातील नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. तसेच सरकारवर टीका करून या निर्णयाचे राजकारण करताना दिसत आहेत.

यावरून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कलम ३७० ‘ रद्द करणं हा राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विषय आहे असं विधान केले आहे. तसेच ‘कलम ३७०’ रद्द करणं काळाची गरज आहे. आपण सर्वांनी राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. कलम ३७० हा राजकीय मुद्दा नसून तो राष्ट्रहिताचा मुद्दा आहे कारण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे. तेथे जे काही प्रश्न असतील ते सोडवून काश्मीरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असं विधान केले आहे.

 

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे अशी टीका भाजपवर आणि माध्यमांवर केली आहे.

दरम्यान, मोदी सरकारने मोठा निर्णय घेत कलम ३७० काढून टाकले असून काश्मीर राज्याचे विभाजनही करण्यात आले आहे. यानुसार आता राज्याबाहेरील जनतेला काश्मीरमध्ये वास्तव्य करता येणार आहे. तसेच काश्मीर आणि लडाख यांना केंद्र्शाशित प्रदेशाचा दर्जाही देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!