🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पक्षाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. असे असताना राजकीय नेत्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर हरियाणाची कुस्तीपटू बबिता फोगाट आणि तिचे वडील महावीर फोगाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्याने प्रेरीत झाल्याने त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रीजीजू यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat meet BJP Working President JP Nadda, after joining the party. pic.twitter.com/GYOVO1NFjc
— ANI (@ANI) August 12, 2019
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर सिंग जननायक जनता पक्षाला पाठिंबा देत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जम्मू काश्मीर मधून कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने देश पुन्हा एक झाला आहे. त्यांच्या या निर्णयाला प्रेरित झाल्याने त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे. फोगाट यांना कुस्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करायचे आहे. जननायक जनता पक्षात काम केल्यास ते शक्य होणार नसल्याने त्यांनी जेजेपी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जननायक जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तसेच फोगट यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे बबिता आणि महावीर फोगट यांचा भाजपला निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे
महत्वाच्या बातम्या
शैलजादेवी जयंत पाटील यांच्या मातृत्वाच्या ओलाव्याने पूरग्रस्त शेतमजूर कुटुंब गहिवरले
राणा पाटील यांनी दिला वाटतं आमदारकीचा राजीनामा ? मतदारसंघात उलटसुलट चर्चा
बजरंगाची कमाल : तबलिसी ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत पटकावले सुवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

