नागपूर – राज्यात २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचं राज्यात सरकार आलं. मात्र, सुरुवातीपासूनच विरोधकांकडून टीका केली गेली त्याप्रमाणे सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद असल्याचं समोर आलं आहे.महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे काही नेते सांगत असले तरीही तिन्ही पक्षात धुसफूस सुरु असल्याचे समोर आले असून हे मतभेद अजूनही कमी झाले नसल्याचं दिसून आलं आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून महाविकास आघाडीत घमासान सुरु झाले. काँग्रेस पक्षाला गृहीत धरू नका, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात काँग्रेस तडजोड करणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बैठक न लावल्यास मंत्रिमंडळ बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.
अजित पवार जर मंत्रीमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालाच आहे असे समजत असतील तर हा उपसमितीचा अपमान असल्याची भूमिका नितीन राऊत यांनी प्रसिद्ध पत्रकात मांडली आहे. तसेच, मंत्रीमंडळातून बाहेर पडायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचा आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत. काँग्रेस नेहमीच मागासवर्गीयांच्या सोबत राहिली आहे, मात्र, मागासवर्गीयांसबोत जे सध्या चालू आहे ते आम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या कानावर घालू, असेही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्यांवर बरसली कंगना, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
