🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.
सद्या मुंबई मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरेमधील कारशेडला पर्यावरण प्रेमींसह स्थानिकांनी विरोध केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, केंद्र सरकारने या जमिनीवर आपला हक्क असल्याचं सांगितल्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला आहे.
यावरून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अहंकारीपणामुळे सामान्य जनतेच्या पैश्याचं नुकसान होत असल्याची टीका केली होती. ठाकरेंनी आज भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतं. त्यामुळे केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला?’ असा सवाल उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारने निवडलेल्या कांजूरमार्ग जागेचं समर्थन देखील केलं. तसेच, ‘महाराष्ट्रासाठी, मुंबईकरांसाठी मी अहंकारी आहे’ असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या संवादानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार!’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! – फडणवीस
‘बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका,ही हात जोडून विनंती आहे!’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80%पूर्ण होत आहे.आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार!
मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे,त्यांना आणखी त्रास नको.हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका,ही हात जोडून विनंती आहे!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी? संजय राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल!
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, तब्बल 50 लाखांचा निधी मिळवा; राजेंद्र यड्रावकरांची मोठी घोषणा
- प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं हे कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य : उद्धव ठाकरे
- विना मास्क सेल्फी काढल्यामुळे ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींना भरावा लागला तब्बल 2.57 लाखांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
