Share

विना मास्क सेल्फी काढल्यामुळे ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींना भरावा लागला तब्बल 2.57 लाखांचा दंड

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना आजाराचे जगभरामध्ये असंख्य बळी ठरले आहेत. तर जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट देखील उसळली आहे. अद्याप या आजारावर लस देखील उपलब्ध झालेली नाही त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच पालन  करणं मास्काचा वापर करणं अत्यंत गरजेचे आहे.

काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान मास्क न घालता सेल्फी काढणं एका देशाच्या राष्ट्रपतींना चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 2.57 लाखांचा दंड भरावा लागला आहे.

चिली देशाचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा यांना 3500 डॉलर्स म्हणजे जवळपास 2.57 लाखांचा दंड भरावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रपतींना दंड भरावा लागला आहे. राष्ट्रपतींनी विना मास्क समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढला आहे. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चिलीच्या आरोग्य विभागाने या व्हायरल फोटोवर प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वांसमोर जाहीर माफी मागत दंड भरण्याची वेळ चिलीच्या राष्ट्रपतींवर आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!