Share

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, तब्बल 50 लाखांचा निधी मिळवा; राजेंद्र यड्रावकरांची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर:- राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 50 लाखांचा निधी देण्याची घोषणा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे. त्यामुळे आता गावोगावी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी २५ लाखांचे बक्षिस पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी या गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून, इतरही गावे बिनविरोध करण्याचा निर्णय लंके यांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!