🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही, पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत आहेत.
७० ते ७५ टक्के नागरिक हे मास्क वापरत असून उरलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य, अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता असल्याचं सांगत त्यांनी अधिक खबरदारी घ्यावी असं देखील सांगितलं आहे.
दरम्यान, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे.
केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर जानेवारीमध्ये लसीकरण सुरु करू शकतो अशी शक्यता आहे. तर, पहिल्या टप्प्यात तब्बल ३ कोटी नागरिकांना लस देण्यासाठीचे मायक्रो-प्लॅनिंग देखील पूर्ण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी? संजय राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल!
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी
- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, तब्बल 50 लाखांचा निधी मिळवा; राजेंद्र यड्रावकरांची मोठी घोषणा
- नागपूर : २१ डिसेंबर पासून पाणी बिलावरीलही शास्ती होणार माफ
- नागपूर मनपाच्या माध्यमातून आठ हजार पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज मंजुर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
