Share

‘हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकतात, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ’

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानामुळे मागील तीन दिवस मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तर, उच्च न्यायालयाने राणेंना दिलासा दिला आहे. ठाकरेंवरील विधानानंतर शिवसेनेने संताप व्यक्त करत अनेक ठिकाणी राडा घातल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, आता राणेंच्या ज्या जन आशीर्वाद यात्रेमुळे हा वाद सुरु झाला होता ती यात्रा आता कोकणात शेवटच्या टप्प्यावर आली आहे. जन आशीर्वाद उद्यापासून पुन्हा सुरु होणार असून सिंधुदुर्गात शेवट होणार आहे. मात्र या यात्रेला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी विरोध केला असून अधिक संघर्ष टाळण्यासाठी सिंधुदुर्गात जमावबंदी देखील लावण्यात आली आहे.

यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. ‘यात्रेला विरोध करायला आमदार वैभव नाईक यांनी यावं. मग आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ. हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकत असतात. नियम पाळून आम्ही यात्रा काढणार आहोत. यात्रा निघणारच. सिंधुदुर्गात यात्रेचा दिमाखदार शेवट होणार आहे,’ असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!