🕒 1 min read
मुंबई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर सोमवारी हजर झाले. त्यानंतर १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
अनिल देशमुख यांना अटक झाली. आता अनिल परब यांचा नंबर आहे, असं विरोधक म्हणत आहेत. विरोधकांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्या भाषेत बोलायचं झालं तर चुXX आहेत ते लोकं. चुXX..,असा शब्द स्वर्गीय बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चुXXचा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का? असा संतप्त सवाल करतानाच तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहे. पण आम्ही या पातळीवर उतरायचे का?, असा संतप्त सवाल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, आम्ही या पातळीवर उतरणार नाही. आम्हाला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपायची आहे. बोंबलणारे लोक बाहेरचे आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे मूळचे लोकं आहेत. त्यांना आम्ही उत्तर देऊ ना. हे हौशे गवशे, नाचे बाहेरून आले आणि भाजपचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. त्यांना काय माहीत आहे भाजप?, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप राक्षस गणाचा आणि खालच्या पातळीचा पक्ष; परमबीर सिंगवरुन मिटकरींची केंद्र सरकारवर टीका
- ‘ठाकरे सरकारच्या मदतीनेच परमबीर सिंह गायब’, आशिष शेलारांचा पलटवार
- ‘देशमुखांच्या रुपाने आज ‘घोटाळा इलेव्हन’ची पहिली विकेट पडली, लवकरच टीम ऑल आऊट होईल’
- देशमुखांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अटक करण्यात आली; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, महेबूब शेख यांचा भाजपाला टोला
- ‘सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी… ‘, नवाब मालिकांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
