🕒 1 min read
मुंबई : पत्रकार परिषद घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
यासंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना. महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करतंय,’ असा धक्कादायक आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय असं शेलार म्हणाले. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, असा दावाही शेलार यांनी घेतला आहे.
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे. या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी,’ असेही यावेळी शेलार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
