Share

भाजप राक्षस गणाचा आणि खालच्या पातळीचा पक्ष; परमबीर सिंगवरुन मिटकरींची केंद्र सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. तर आता या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी परमबीप सिंग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

परमबीर सिंगला केंद्र सरकारचे अभय असल्यामुळे तो आज विदेशात लपून बसला आहे. भाजप किती खालच्या पातळीचा पक्ष आहे हे देशाच्या लक्षात आलं आहे. भाजप राक्षस गणाचा पक्ष आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!