🕒 1 min read
पुणे : 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदिप गावडे यांनीही अनिल देशमुखांच्या अटकेवरुन टीका केली आहे.
अनिल देशमुखांच्या रुपाने आज ‘घोटाळा इलेव्हन’ची पहिली विकेट पडली आहे. लवकरच पूर्ण टीम ऑल आऊट होईल…., असं प्रदिप गावडे म्हणाले आहेत.
अनिल देशमुखांच्या रुपाने आज 'घोटाळा इलेव्हन' ची पहिली विकेट पडली आहे, लवकरच पूर्ण टीम ऑल आऊट होईल..! #AnilDeshmukh @KiritSomaiya @AnilDeshmukhNCP
— Adv. Pradip Gavade (@PradipGavade) November 2, 2021
दरम्यान,१०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल (1 नोव्हें.)अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले.
सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर 13 तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- देशमुखांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अटक करण्यात आली; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, महेबूब शेख यांचा भाजपाला टोला
- ‘सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी… ‘, नवाब मालिकांचा घणाघात
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
