मुंबई: १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. तर आता या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ज्या चुकीच्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. असे ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
माजी गृहमंत्री श्री अनिल जी देशमुख साहेब यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ज्या चुकीच्या पद्धतीने अटक केली त्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.#केंद्रासरकार निषेध@AmitShah@PMOIndia@aajtak @ndtvindia @ABPNews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 2, 2021
दरम्यान १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल(१ नोव्हें.)अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक


