मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्वच भाजप नेत्यांनी मिळून नवाब मलिकांवर निशाना साधला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी अभिनेता रजनीकांत यांचा एक डायलॉग ट्विट करत भाजपावर निशाना साधला आहे. ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, असा टोला महेबूब शेख यांनी लगावला.
मेहबूब शेख ट्विटमध्ये म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेच्या नंतर संपूर्ण भाजपा स्टेटमेंट देत सारवासारव करत आहे. यावरून मला रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ फिल्म मधील डायलॉग आठवला. ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’! असा टोला महेबुब शेख यांनी लगावला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते @nawabmalikncp साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेच्या नंतर संपूर्ण भाजपा स्टेटमेंट देत सारवासारव करत आहे. यावरून मला रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' फिल्म मधील डायलॉग आठवला. 'मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं'!
— Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@MahebubShaikh20) November 1, 2021
नवाब मलिकांनी गेले काही दिवस एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर करत त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. आर्यन खानच्या सुटकेनंतर हे प्रकरण काहीसं शमलं. मात्र आता नवाब मलिकांनी या प्रकरणाबाबत भाष्य करणं सोडलं नाही. नवाब मलिक यांनी ट्विटर वार करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन भाजपा नेते नवाब मलिकांवर प्रचंड टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत हरिकाची पोगोनिनाविरुद्ध आघाडी


