Share

“मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आणि इज्जत आहे की नाही अशोकराव?”, भातखळकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच याविषयी बोलत असतांना राज्यातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही. जो निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणीही होणार नाही, आमदारांनी घरांची मागणी कधी केलीच नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. दरम्यान, चव्हाणांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘पण ती घोषणा तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आणि इज्जत आहे की नाही अशोकराव?’, अशी खोचक टीका भातखळकरांनी केली आहे.

दरम्यान, तुळजापूरमध्ये सोमवारी (२८ मार्च) सकाळीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. चव्हाण यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असतांना ते म्हणाले की, ‘आमदारांना घरे देण्याचा असा कुठलाही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. कुणाची मागणीच नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधकांनी यावरून उगाच आरोप केले आहेत. मात्र आमदारांना घरे देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!