Share

IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आयपीएल २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सकडून एकाच फ्रेंचायझीसाठी खेळायचे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावानंतर, दोन्ही भाऊ स्वतंत्र फ्रेंचायझींचा भाग बनले. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने निवडले आणि त्यांचा कर्णधार बनवले, तर कृणाल पंड्याला लखनऊ सुपरजायंट्सने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.

आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना झाला. हार्दिक पंड्याने त्याच्या कोट्यातील चार षटके टाकली, पण कृणालला त्याचा सामना करावा लागला नाही. पण हार्दिकला कृणालसमोर फलंदाजी करावी लागली. टायटन्सचा संघ १५/२ या धावसंख्येवर झुंजत असताना हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने मॅथ्यू वेडसह डाव सावरला. ही भागीदारी तोडण्यासाठी केएल राहुलने कृणाल पंड्याकडे चेंडू दिला.

https://twitter.com/KumarVk66/status/1508645485221130241

क्रुणालच्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात हार्दिकने शानदार चौकार ठोकला. मात्र, क्रुणालने त्याच्या स्पेलच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकला बाद केले. कृणालने सेलिब्रेशन न करता हार्दिकला निरोप दिला. क्रुणालने चेहऱ्यावर हात ठेवून हलकेच स्मितहास्य केले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेली हार्दिकची पत्नी नताशा गोंधळलेली दिसली. हार्दिकने २८ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या.

सामन्यानंतर हार्दिकला याबाबत प्रश्न विचारला असता, तो म्हणाला, की विकेट गमावणे निराशाजनक होते पण नंतर विजय मिळाला, ज्यामुळे दिलासा मिळाला. एका भावाला विकेट मिळाली, तर दुसऱ्याला विजय मिळाला, म्हणून कुटुंबातील प्रत्येकजण आनंदी असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!