मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच याविषयी बोलत असतांना राज्यातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही. जो निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणीही होणार नाही, आमदारांनी घरांची मागणी कधी केलीच नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. दरम्यान, चव्हाणांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अहो अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय स्वतः घोषित केला. मग आता निर्णय झाला नव्हता असे कसे म्हणता?’,असा सवाल उपाध्येंनी केला आहे.
दरम्यान, तुळजापूरमध्ये सोमवारी (२८ मार्च) सकाळीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. चव्हाण यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असतांना ते म्हणाले की, ‘आमदारांना घरे देण्याचा असा कुठलाही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. कुणाची मागणीच नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधकांनी यावरून उगाच आरोप केले आहेत. मात्र आमदारांना घरे देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही.’
महत्वाच्या बातम्या
- विराजस–शिवानीने गुपचुप उरकले लग्न? व्हिडीओ होतोय व्हायरल
- “लॉकडाऊनच्या काळात दाखल सर्व गुन्हे मागे घेणार”, दिलीप वळसे पाटलांची माहिती
- “बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी…”, यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन; पाहा VIDEO
- “प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे


