🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामण यांच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या यामध्ये केंद्र सरकार दोन सरकारी बँका विकणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी आज केली. त्याचबरोबर एका विमा कंपनीचं तर दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे किंवा त्या विकल्या जातील असे यावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच सरकारकडून देशातील कंपन्या आणि बँका यांच्या खाजगीकरणाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. आज त्यावर अर्थसंकल्पा दरम्यान शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे अतिरिक्त भूखंडही विकले जाणार आहेत. तसेच सरकार आयडीबीआय बँकेचेही खासगीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे.
यावर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका कराण्यात आली. केंद्र सरकारने विमा, रेल्वे, संरक्षण, स्टील, बँक आणि सर्व काही विक्रीला काढलं आहे. हे बजेट आहे की ओएलएक्स आहे? असा सवाल डावे नेते मोहम्मद सलीम अली यांनी केला आहे. तर हे बजेट भांडवलदार धार्जिणं असल्याची टीका सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताकडे आधीच कोरोनाच्या दोन लसी, आणखी दोन लसी येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
- पत्नीला नांदवत नसल्याने शिक्षकाला मारले
- नाफेडच्या तूर खरेदीला आजपासून प्रारंभ
- देशात महाराष्ट्र आहे पण बजेटमध्ये दिसत नाही- छगन भुजबळ
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला

